यशवंतराव होळकरांचे जीवन महाकाव्याच्या नायकाला साजेसे आहे. त्यांचे जीवन हेच एक महानाट्य आहे!
संकटांची वादळे, युद्धांचा सतत झंझावात, सतत विजयाची आस, स्वातंत्र्याची आस, विश्वासघात सहज पचवत पुढे जाण्याची तयारी, अफाट नेतृत्वक्षमता, पराकोटीचे युद्धकौशल्य, नितांत दुर्दम्य आशावाद, प्रयत्नांची निराश न होता केलेली पराकाष्ठा, क्षमाशीलता, शत्रूशी दुर्दात क्रूरता असे सर्व गुण एकत्र असणारा महायोद्धा व राज्यकर्ता यशवंतराव होळकर म्हणजे महाराजा यशवंतराव होळकर. त्यांचे जीवन हेच एक महानाट्य आहे.......